
Apala Bharat Apali Sanskriti (आपला भारत आपली संस्कृती)
₹ 15.00
Out of stock
Tags:
भारताचा प्राचीन इतिहास व पुरातन कालापासून आजपर्यंत भारतात प्रचलित असलेल्या विभिन्न प्रकारच्या सांस्कृतिक तथा सामाजिक जीवनाचे चित्र प्रस्तुत पुस्तकात रेखाटण्यात आले आहे. स्वामी विवेकानंदांनी आपल्या व्याख्यानांमधून आपला भारत, आपली संस्कृती, आपला धर्म, आपला इतिहास – अशा अनेक पैलूंवर चर्चा केली होती. त्यातील महत्त्वपूर्ण असे विचार प्रस्तुत पुस्तिकेत एकत्रित करण्यात आले आहेत. याद्वारे आपल्याला भारताची राष्ट्रीय ध्येये कोणती आहेत व त्यांच्यावर भर दिल्याने आणि ती कृतीत आणल्याने भारतभूमीचे पुनरुत्थान कसे होऊ शकते या गोष्टींचे स्वामीजींनी सुस्पष्ट वर्णन केले आहे. अशा प्रकारचे मौलिक विचार आज जर युवा वर्गाच्या हाती पडतील तर त्या विचारांच्या वाचनाने आजचा युवक आपले व्यक्तिमत्त्व व चारित्र्य-संवर्धन करण्यात सक्षम होईल. त्याचबरोबर समाजाप्रती असणारी आपली कर्तव्ये पालन करण्यात तो यशस्वी होईल अशी आम्हाला आशा वाटते. परिणामी, उद्याचा भारत जगाच्या शीर्षस्थानी विराजमान होईल यात काहीच शंका नाही.