Atmonnatiche Sopan (आत्मोन्नतीचे सोपान)
₹ 60.00
Out of stock
Tags:
ब्रह्मलीन स्वामी आत्मानंद महाराज यांच्या आकाशवाणीहून प्रसारित झालेल्या श्रुतिका यामध्ये संकलित करण्यात आलेल्या आहेत. आत्मानंद महाराज एक प्रतिभाशाली वक्ता व लेखक होते. ते छत्तीसगड येथील रायपुरच्या रामकृष्ण मिशन आश्रमाचे संस्थापक-सचिव होते. विद्यार्थिदशेपासूनच ते अतिशय मेधावी बुद्धीचे होते. उत्तुंग शैक्षणिक कारकीर्द घडवून त्यांनी रामकृष्ण संघात प्रवेश घेतला आणि शेवटपर्यंत श्रीरामकृष्ण-विवेकानंद समर्पित सेवापरायण जीवन व्यतीत केले. महाराजांच्या आध्यात्मिक प्रतिभेचा प्रत्यय आपल्याला त्यांच्या वाणीतून व लेखणीतून मिळतो. भारताची आध्यात्मिक विचारधारा, गीता-उपनिषदे, रामायण तसेच श्रीरामकृष्ण-विवेकानंद इत्यादी विषयांवरील त्यांची प्रवचने आपल्यासाठी एक अनमोल ठेवा आहे.
मुळात हिंदीतून दिली गेलेली ही लहान लहान प्रवचने केवळ विचारप्रवर्तकच नव्हे तर विचारांना सुयोग्य दिशा आणि गती देणारीही आहेत. जीवनसंग्रामाला धैर्याने आणि नैतिकतेने सामोरे जाऊन क्रमशः उन्नत होण्यास.ाठी आवश्यक असे अनेकानेक धडे आपल्याला यातून मिळतील. या पुस्तकातून प्रेरणा प्राप्त होऊन आदर्शवाद आणि वास्तविकता यांचे संतुलन राखणारे, नैतिक-आध्यात्मिक मूल्ये जोपासणारे स्वामी विवेकानंदप्रणीत मनुष्यनिर्मितीचे कार्य साध्य होईल.